ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आरोसमधील रक्तदान शिबिरात केले २३ रक्तदात्यांनी रक्तदान!

आरोसमधील रक्तदान शिबिरात केले २३ रक्तदात्यांनी रक्तदान!

प्रकाशन: 20 Feb 2022 09:29 PM
वाचन संख्या 64

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली, कोंडूरे तिठा, आरोस तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस, कोंडुरे तिठा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी २३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवजयंती असल्याने चैतन्यमयी व उत्साहपूर्ण वातावरणात रक्तदात्यांनी, ग्रामस्थांनी व हितचिंतकांनी रक्तदान शिबिराला भरभरुन प्रतिसाद दिला.

निवृत्त पोलिस उपअधिक्षक तथा “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान” चे सल्लागार दयानंद गवस यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार घालून तसेच जि. प. सदस्य राजन मुळीक व पं. स. सदस्य संदीप नेमळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान” चे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे यांनी संस्थेची ध्येयधोरणे व आत्तापर्यंतच्या प्रगतीचा आलेख याविषयी सविस्तर विवेचन करतानाच संस्थेच्या “रक्तदान, देहदान, अवयवदान, रुग्णमित्र आणि मित्रसंस्था” या पंचसूत्रीविषयी माहिती दिली.यावेळी युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, पं. स. सदस्य संदीप नेमळेकर, सल्लागार दयानंद गवस, जि. प. सदस्य राजन मुळीक या सर्वांनी स्वराज् युवा मित्रमंडळाच्या नवतरुण शिलेदारांनी पहिल्यांदाच अत्यंत स्तुत्य असा रक्तदानाचा कार्यक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान” ला उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर वरील मान्यवरांसोबतच आरोस सरपंच शंकर नाईक, दांडेली माजी सरपंच संजय पांगम, आरोस हायस्कूलचे मुख्याध्यापक विद्याधर देसाई, कार्यक्रमाचे संयोजक तथा सिंधु रक्तदाते तानाजी खोत, स्वराज युवा मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवम बोंद्रे, सचिव अमेय खोत उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन हायस्कूलचे शिक्षक तानाजी वरक यांनी केले तर स्वराज युवा मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवम बोंद्रे यांनी आभार मानले .

Article image

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वराज युवा मित्रमंडळाचे सर्व नवतरुण कार्यकर्ते तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स