तारकर्ली येथील शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेत शिवजयंती उत्सव संपन्न.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेत शिवजयंती उत्सव अगदी उत्साहाने संपन्न झाला .
या शाळेतील आजपर्यंत आलेले सर्व शिक्षक हे शिक्षणाबरोबर कलागुणांना प्रोत्साहन देत असतात . या शाळेत कोणताही सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम अतिशय जिद्दीने पार पाडला जातो.शाळेत सर्व सार्वजनिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक कार्यक्रम न चुकता विद्यार्थांना आणि ग्रामस्थांना घेऊन पार पडतात. यंदाचा छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंती उत्सव मुलांना विविध वेश भूषेत नटवून केला गेला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कासकर , सौ.लंगवे मॅडम,श्री.गोसावी सर आणि ग्रामस्थ उपस्थित होते .
या उत्सवातील सांस्कृतिक योगदानाबद्दल सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे तालुक्यामध्ये कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)