ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोझरी इंग्लिश स्कूलच्या १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न..!

रोझरी इंग्लिश स्कूलच्या १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न..!

प्रकाशन: 18 Feb 2022 04:39 PM
वाचन संख्या 410

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल या प्रशालेमध्ये इ. १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रोझरी पॅरिश चर्चचे प्रमुख फादर सॅबी डिमेलो उपस्थित होते.फादर सॅबी डिमेलो यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना घाबरू न जाता सामोरे जायचे आवाहन केले. आयुष्यात येणाऱ्या समस्यांसाठी सदैव तयार राहण्याचा संदेश देताना फादर सॅबी डिमेलो यांनी आयुष्यात यशस्वी होताना विश्वास ढळू देऊ नका असा जीवन उपदेशही समजावून सांगितला.


शाळेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन म्हणाले यांनी विद्यार्थ्यांना शाळेने दिलेल्या शिक्षण आणि संस्कारांची जाणीव राखायचा बोध दिला. त्यामुळे आयुष्यात यशस्वी झाल्यावर या शाळेला विसरून न जाता विद्यार्थ्यांनी त्यांच्या वागण्याने समाजात नाव मिळवावे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे अशी आशा व्यक्त केली.


रोझरी इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी १० वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स