ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आज डोंगरपाल सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव होतोय साजरा...!

आज डोंगरपाल सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव होतोय साजरा...!

प्रकाशन: 16 Feb 2022 12:40 AM
वाचन संख्या 64

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरपाल येथील ‘नवसाला पावणारा’ अशी ख्याती असलेल्या श्री सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव बुधवार १६ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता धार्मिक विधी, दुपारी १२ ते ५ दरम्यान ओटी भरणे, दुपारी १ वा. अल्पोपहार, सायंकाळी ७ वाजता नवस बोलणे व फेडणे,गार्‍हाणी घालणे, ८ वा. स्थानिकांचे भजन, ९ वा. पावणी, ११ वा. महाप्रसाद होईल.
सुमारे ३०० वर्षांपूर्वी डोंगरपाल सिद्धाच्या डोंगरावर संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच एका सिद्ध पुरुषाने जिवंत समाधी घेतली. भंडारा पौर्णिमेला दरवर्षी भंडारा उत्सव साजरा केला जातो. संततीच्या नवसाला पावणारे देवस्थान अशी याची ख्याती आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डोंगरपाल ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स