ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आदर्श आचरा व्यापारी संघटनेची गानकोकीळेस भावपूर्ण  श्रद्धांजली..!

आदर्श आचरा व्यापारी संघटनेची गानकोकीळेस भावपूर्ण श्रद्धांजली..!

प्रकाशन: 07 Feb 2022 03:19 PM
वाचन संख्या 53

चिंदर |‍ विवेक परब : अमृत अमरत्व लाभून सजीव असलेल्या अजरामर स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर निधनाने गीत संगीत क्षेत्रातील ध्रुव निखळला अशा शब्दात आचरा व्यापारी संघटनेचे जेष्ठ व्यापारी आणि रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिराचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पिली. स्वरसम्राज्ञी लतामंगेशकर यांना सोमवारी सकाळी आचरा व्यापारी संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लतादीदींच्या आठवणींना सांबारी यांनी उजाळा दिला. यावेळी त्यांच्या सोबत आदर्श व्यापारी संघटना आचराचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,उपसरपंच पांडुरंग वायंगणकर,अशोक कांबळी, संघटनेचे जयप्रकाश परुळेकर,मंदार सांबारी,वामन आचरेकर, पंकज आचरेकर,हेमंत गोवेकर,परेश सावंत, संदिप पांगम,उदय घाडी,महेश शेटये,गजानन गांवकर, उज्वल कोदे,रविंद्र बागवे,गणेश सावंत,किरण ढेकणे, विजय लाड,नरेंद्र कोदे यांसह अन्य व्यापारी आदी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष मंदार सांबारी यांनी सातही स्वर होते जिच्या वरती लुब्ध ,स्वरांचा साज देवूनी जगाला लतादीदी निघाली परतीच्या प्रवासाला अशा स्वरचीत काव्यातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जेष्ठ नागरीक संघाचे अशोक कांबळी यांनी ही लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स