ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा नट वाचनालयाकडून सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली.

बांदा नट वाचनालयाकडून सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली.

प्रकाशन: 07 Feb 2022 05:15 PM
वाचन संख्या 69

बांदा | राकेश परब : अमृततुल्य अजरामर स्वरांनी सात दशके अविरतपणे भारत आणि जग भरातील रसिकांच्या अंत:करणाचा ठाव घेणा-या गानसम्राज्ञी भारत रत्न लता मंगेशकर यांना बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी माजी मुख्याध्यापक धोंडु फणसीकर यांनी लताजींच्या प्रतीमेला पुष्प हार अर्पण केला. यावेळी एस आर सावंत, सुभाष मोर्ये, हेमंत मोर्ये, राकेश केसरकर, जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, सौ स्वप्निता सावंत,अर्जुन परब,ग्रथपाल प्रमिला मोरजकर-नाईक, सौ नमिता परब उपस्थित होत्या.या प्रसंगी सुभाष मोर्ये यानी बोलताना सांगीतले, लता दिदी हा न संपणारा विषय आहे. किती सांगावे,लिहावे, बोलावे तेवढे थोडेच आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे हे आहे की हा विषय कधीच संपु नये ही इच्छा असणे हिच खरी त्यांना श्रध्दाजली आहे. राकेश केसरकर यांनी श्रध्दांजली वाहताना म्हणले की लतादिदींच्या जाण्याने देशात पोकळी निर्माण झाली आहे.त्यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यांत अश्रु आले तर कधी “ऐ मेरे वतन के लोगो” या गीताने जवानांना हिम्मत मिळाली. हेमंत मोर्ये यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स