ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवली सकल मराठा समाज करणार जल्लोषात शिवजयंती साजरी...!

कणकवली सकल मराठा समाज करणार जल्लोषात शिवजयंती साजरी...!

प्रकाशन: 06 Feb 2022 02:33 PM
वाचन संख्या 65

नियोजन बैठकीत पुतळा स्थलांतर विषयावरही झाली महत्वाची चर्चा..!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : कणकवली तालुका सकल मराठा समाज समाजातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे.त्यानिमित्ताने नियोजन मराठा समाजातर्फे करण्यात आले.या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर,महिलांसाठी हळदीकुंकू, लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच पुतळा स्थलांतर विषयावरही महत्वाची चर्चा करण्यात आली.

कणकवली येथील एचपीसीएल सभागृहात ही नियोजन बैठक मराठा संयोजकांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी सकल मराठा समाजाचे नेते एस.टी. सावंत,लवू वारंग,अध्यक्ष भाई परब,महेंद्र सांब्रेकर, सोनू सावंत,सुशील सावंत, बच्चू प्रभुगावकर, सुशांत दळवी,बबलू सावंत,शेखर राणे,एस.एल.सपकाळ,माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड,सुशांत राऊळ,तेजस राणे,शिक्षक प्रतिनिधी दत्ता सावंत,सूर्यकांत वारंग,नीलकंठ वारंग,आर.जी.सावंत,राज विचारे, रवींद्र विचारे,सौरभ धुरी,शैली सावंत,तन्वी भावे,साहिल तोरस्कर आदींसह सकल मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स