ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
वेंगुर्ले कॅम्प येथील दहा महिलांना मोफत शिलाई यंत्रांचे वाटप.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वेंगुर्ले कॅम्प येथील दहा महिलांना मोफत शिलाई यंत्रांचे वाटप.

प्रकाशन: 05 Feb 2022 03:19 PM
वाचन संख्या 113

जनशिक्षण संस्थेचा उपक्रम.

चिंदर | विवेक परब : भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध संस्थां मधील जनशिक्षण संस्थेमार्फत वेंगुर्ले कॅम्प कॉलनी येथील दहा महिलांना माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या उपस्थितीत शिलाई मशीनचे वाटप आणि व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले.
कॅम्प कॉलनी येथे हा शिलाई मशीन वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जन शिक्षण संस्था परिवर्तन केंद्र जिल्हा समन्वयक विलास हडकर, वेंगुर्ले चे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका उपाध्यक्ष बाबली वायंगणकर, बाळा सावंत, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर, राजन लाड, नितीन चव्हाण तसेच लाभार्थी महिला रोशनी वायंगणकर, समीक्षा परब, रूपा वेंगुर्लेकर, दया परब, प्रियांका कोयंडे, मंगल बुरुड, सोनाली जगताप, रश्मी गावडे, सुहानी परब, रिया गिरप
आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री हडकर म्हणाले की, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात महिलांना शिलाई मशीन चे मोफत वाटप करून क्लस्टर उभे करण्याचे काम सुरू आहे. त्याच बरोबर शाळकरी मुलींना सायकलचे वाटप, महिला, युवक अशा सर्वांना वेगवेगळे प्रशिक्षण संस्थांच्या मार्फत देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभ करण्यासाठी सुरेश प्रभू यांचे प्रयत्न सुरू आहेत. वेंगुर्ले शहरात या १० शिलाई मशीन एका गटाला दिल्या आहेत. गटातील महिलांनी प्रामाणिकपणे या मशीनचा वापर स्वतःच्या व्यवसायासाठी करावा, आणि विश्वास संपादन करावा. जेणेकरून संस्थेमार्फत पुढील सहकार्यही अजून चांगल्या पद्धतीने करता येईल असे त्यांनी सांगितले. तसेच भाजपच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन काम करूया व आपली प्रगती साधूया असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष गिरप यांनीही मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसन्ना देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार बाबली वायंगणकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स