ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
फोंडाघाट येथे युवासेना आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेचे युवानेते संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन.

फोंडाघाट येथे युवासेना आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेचे युवानेते संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन.

प्रकाशन: 04 Feb 2022 05:33 PM
वाचन संख्या 88

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार.

चिंदर | विवेक परब : शिवसेना युवासेने तर्फे भरविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अंतिम सामना फोंडाघाट संघ आणि सावंतवाडी संघामध्ये होऊन या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात सावंतवाडी संघावर मात करत फोंडाघाट संघाने विजेतेपद पटकावले.
युवासेना फोंडाघाट तर्फे भरविण्यात आलेल्या या भव्यदिव्य जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन शिवसेना नेते संदेश पारकर आणि युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य संजय आग्रे, राजन नानचे, शहरप्रमुख सुरेश टक्के, पिंटू पटेल, सुभाष सावंत, शाम भोवड, अविनाश सापळे, बाळा येळवकर, आनंद मर्ये, सचिन तायशेटे, राजेश शिरोडकर, सौ.अवसरे मॅडम, सौ माधवी दळवी मॅडम, सौ संजना कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित शिवसेना नेते संदेश पारकर आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी प्रणित संकल्प पॅनल मधून विजयी झालेल्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
युवासेना फोंडाघाट तर्फे घेण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये कुडाळ, मालवण, कणकवली, सावंतवाडी तसेच देवगड तालुक्यातील १२ मातब्बर संघांनी सहभाग घेतला होता. रात्री प्रकाश झोतात झालेल्या या स्पर्धेमध्ये अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये फोंडाघाट च्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला तर सावंतवाडीच्या संघाला द्वितीय क्रमांक मिळाला.
दरम्यान या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवासेना शहरप्रमुख प्रथमेश उरणकर, सौरभ सुतार, पवन भोगले, जयेश पटेल, प्रवीण पडेलकर, शुभम लाड, महेश चव्हाण, प्रथमेश पारकर, सौरभ भोगटे,चेतन सुतार, सागर वाळवे, साहिल सुतार, ओंकार हाऊळ, पुष्पक नाईक ,साहिल बिडये, निनाद पारकर, राज सावंत, विजय सूद, सुयश सापळे, ओंकार पारकर, हरेश पावसकर, सुरज चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.या स्पर्धा पाहण्यासाठी फोंडाघाट पंचक्रोशीतील हॉलीबॉल प्रेमी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स