ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मुणगे गांवात पंखाविना भरारी प्रेरणा उपक्रम.

मुणगे गांवात पंखाविना भरारी प्रेरणा उपक्रम.

प्रकाशन: 04 Feb 2022 12:25 PM
वाचन संख्या 108

मुंबई महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त विशेष शिक्षिका व समाजसेविका सौ.शरयू घाडी यांचे सात्विक मार्गदर्शन.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मनाच्या श्लोकांची फलश्रुती अगाध आहे. मनावर झालेले चांगले संस्कार मरेपर्यंत आनंद, मन:शांती देतात. यासाठीच मनाचे श्लोक ही महान संस्कार संपत्ती समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्याला दिली आहे. या श्लोकांचा उपयोग जे करतील त्यांचे जीवन नक्कीच सुंदर होईल असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त विशेष शिक्षिका व समाजसेविका सौ. शरयु नागेश घाडी यांनी मुणगे येथे केले.


राष्ट्रीय बालश्री पुरस्कार प्राप्त प्रसाद घाडी याच्या स्मरणार्थ व त्याच्या जिद्दीची प्रेरणा सर्वांपर्यत पोहोचावी यासाठी त्याचे आई – बाबा हे गेली बारा वर्षे ‘पंखावीना भरारी’ हा प्रेरणा उपक्रम विविध प्रकारे आयोजीत करतात. यावर्षी सदर उपक्रम मुणगे येथे नवीन वास्तुप्रवेशाच्या निमित्ताने आयोजीत करण्यात आला होता. यावेळी दिव्यांगत्वावर मात करुन गायन व वादन करणारा कुणकेश्वर शाळेच्या विद्यार्थी नयन धुरी याचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजीत मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत जयश्री मेस्त्री, विदीत रासम, विवेक परब, जान्हवी मुणगेकर, निशांत रासम, रितेश मुणगेकर, अर्चिता रुद्रेश परब यानी सहभाग घेतला. त्याना भेटवस्तु देवून सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजीक बांधीलकी जपताना गावासाठी कॉलेज इमारतीस आर्थिक मदत देणाऱ्या सौ बांदेकर मॅडम,अन्नपुर्णा सौ. शरयु विलास मुणगेकर, पत्रकार झुंजार पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री भगवती देवस्थान अध्यक्ष सुधिर महाजन, भगवती हाय प्र. मुख्याध्यापक प्रसाद बागवे, डॉ. के. एन. नायसे, सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, श्री दुधवडकर, नागेश घाडी, सौ. शुभदा गुरव, स्पर्श फाऊंडेशनचे सुरज सावंत, श्री रासम, सौ. वळंजु, अरुण रासम, आशिष आईर, सुधीर मुणगेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सौ. शरयु घाडी यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स