मसुरे देऊळवाडा येथे ७ फेब्रुवारी पासुन अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिर येथे ७ ते १४ फेब्रूवारी या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. हरीनाम सप्ताह प्रारंभ, दुपारी १२ वा महाआरती, रात्री ८ वा. वारकरी दिंडी नृत्य, रात्री १२ वा. महाआरती, १२ फेब्रूवारी रोजी रात्री १२ वा. महाआरती व पालखी सोहळा, १३ फेब्रूवारी रोजी सायं. ४ वा. हळदीकुंकु समारंभ, १४ फेब्रूवारी रोजी सकाळी १० वा. अखंड हरीनाम सप्ताह सांगता, व महाआरती, दुपारी २ ते ५ महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. ज्या भाविकांना अन्नदानासाठी देणगी द्यावयाची असेल त्यानी श्री समर्थ बागवे महाराज संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)