वैभववाडीनजिक आरामबसने घेतला पेट…!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी जवळील एडगांव ,घाडीवाडी इथे आज पहाटे 03.45 च्या दरम्यान मुंबई पुणेमार्गे गोव्याला जाणार्या आरामबस(मनीष ट्रॅव्हल्स) क्र GA 03/ W 2518 या गाडीत शॉर्टसर्किटने आग लागली…व मोठा पेट घेतला. याबाबत तात्काळ घटनास्थळी जाऊन गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. सदर गाडीमध्ये एकूण 37 प्रवाशी होते मात्र कोणतीही जीवितहानी नाही. आग विझवण्याकरिता कणकवली व कुडाळ पोलीस स्टेशनची संपर्क साधून अग्निशामक बंब पाठवण्यात आला होता. अग्निशामक बंब बोलावून संपूर्ण आग विझवण्यात आली. काहीकाळ खोळंबलेली वाहतूकही आता सुरळीत करण्यात आलेली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)