कलंबिस्त येथे श्री देवी भवानी मंदिर आणि श्री देव देसाई वस कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलंबिस्त येथे श्री देवी भवानी मंदिर आणि श्री देव देसाई वस कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन ६ व ७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री देव देसाई वस कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आणि सोमवार दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री देवी भवानी मंदिर कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. रविवारी सकाळी ८.०० वा . देवतांना आमंत्रण, महागणपती पूजन मातृकापूजन , पुण्याहवाचन , मातृकापूजन , नांदीश्राध्द आर्चायादी वरण , प्राकार शुध्दी सकाळी ९ .०० वा . प्रधान देवतांचे आवाहन व पीठपूजा , अग्निस्थापना , सहआवाहन , जलाधिवांस सकाळी १०.०० वा . ग्रामदेवता आमगन सकाळी १०.३० वा . शय्याधिवास , आवाहित देवता व प्रधान देवता हव सकाळी ११.३० वा . कलशारोहण व प्रधान मूर्तिस्थापना तत्वन्यास , उत्तरांग होम . कलशारोहण ज्येष्ठ बंधू बाळकृष्ण देसाई यांच्या शुभहस्ते दुपारी १२.३० वा . बलिदान , स्थाप्यदेवता महापूजा व महानैवेद्य समर्पण , पूर्णाहूती , आरती , गाऱ्हाणे व तीर्थप्रसाद दुपारी ०१.३० वा . – महाप्रसाद संध्या . ७.०० वा . – भजन. सोमवार दि . ७ रोजी सकाळी ८.०० वा . देवतांना आमंत्रण , महागणपती पूजन मातृकापूजन , पुण्याहवाचन , मातृकापूजन , नांदीश्राध्द आर्चायादी वरण , प्राकार शुध्दी सकाळी ९ .०० वा . प्रधान देवतांचे आवाहन व पीठपूजा , अग्निस्थापना , सहआवाहन , जलाधिवांस सकाळी १०.३० वा . शय्याधिवास , आवाहित देवता व प्रधान देवता हवन सकाळी ११.३० वा . कलशारोहण व प्रधान मूर्तिस्थापना तत्वन्यास , उत्तरांग होम . कलशारोहण सदगुरु श्री . मोडक महाराज यांच्या शुभहस्ते दुपारी १२.३० वा . बलिदान , स्थाप्यदेवता महापूजा व महानैवेद्य समर्पण , पूर्णाहूती , आरती , गार्हाणे व तीर्थप्रसाद दुपारी ०१.३० वा . महाप्रसाद संध्याकाळी ०७.०० वा . श्री भवानी देवीचा गोंधळ आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी समस्त भक्तजन , कुटुंबिय , आप्तेष्टांसह कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रींच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी भवानी मंदिर समस्त देसाई समाज आणि ग्रामस्थ कलंबिस्त यांच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)