ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचे 2022/2023 साठीचे प्रवेश सुरु…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचे 2022/2023 साठीचे प्रवेश सुरु…!

प्रकाशन: 01 Feb 2022 03:06 PM
वाचन संख्या 170

25 वर्षांची गौरवशाली यशस्वी परंपरा असलेली ख्यातनाम शिक्षणसंस्था.

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण येथिल सुप्रसिद्ध शिक्षणसंस्था म्हणून नांवलौकीक असलेल्या रोझरी इंग्लिश स्कूलचे साल http://localhost/news/public/uploads/2022/public/uploads/2023 चे प्रवेश सुरु झाले आहेत.
तज्ञ व अनुभवी शिक्षकवृंद, अतिशय शिस्तबद्ध व काटेकोर शाळाव्यवस्थापन,सलग 16 वर्षांचा दहावीचा 100% निकाल अशी वैशिष्ट्ये असणार्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावरदेखील जातीने लक्ष दिले जाते ही या शाळेची उल्लेखनीय बाब आहे.
आता सुरु झालेल्या प्रवेशांपैकी लोअर के.जी.प्रवेशपात्रतेसाठी जानेवारी http://localhost/news/public/uploads/2018 ते डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2018 दरम्यान जन्मलेल्या बालकांनाच विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
सांस्कृतिक,सामाजिक,आरोग्य व क्रिडाविषयक शिक्षणासोबतच या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक शैक्षणिक व बौद्धिक समुपदेशनही केले जात असते.
तसेच वेळोवेळी शासनाच्या शैक्षणिक ध्येयधोरणांनुसारचे प्रकल्पही इथे राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावय डिजिटल तथा ऑनलाईन शिक्षणाचीही सोय प्रशालेतर्फे उपलब्ध आहे.
सदर प्रशालेच्या प्रवेश पत्रिका म्हणजेच ॲडमीशन फाॅर्म दिनांक 01 फेब्रुवारीपासून प्रशालेच्या कार्यालयात सकाळी 09:30 ते 11:30 पर्यंत उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी प्रशालेचा दूरध्वनी क्रमांक 02365253349 यांवरही संपर्क करता येऊ शकतो असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकांनी या गौरवशाली परंपरा असलेल्या प्रशालेत प्रवेश घेऊन आपल्या पाल्यांची एका सुखकर व शैक्षणिक आरोग्यदायी जीवनप्रवासाची सुरवात करावी व त्यांचे भविष्य सुदृढ करावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स