ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रोणापाल माऊली मंदिर परिसरात हायमास्टचे उद्घाटन.

रोणापाल माऊली मंदिर परिसरात हायमास्टचे उद्घाटन.

प्रकाशन: 01 Feb 2022 03:31 PM
वाचन संख्या 61

बांदा | राकेश परब : पंचायत समिती स्तरावर १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या रोणापाल माऊली मंदिर परिसरातील हायमास्टचे उद्घाटन माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले. स्थानिक ग्रामस्थांची कित्येक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. हायमास्टच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून गेला आहे.
यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, जि. प. समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी पं. स. सभापती सौ. मानसी धुरी, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच भिकाजी केणी, माजी सरपंच उदय देऊलकर, बबन भोगटे, शेर्ले सरपंच उदय धुरी, दिलीप भालेकर, अमित परब, मानकरी दादा गावडे, बाबल तुयेकर, इन्सुली ग्रा. पं. सदस्य महेश धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी हायमास्ट मंजुरीसाठी प्रयत्न केलेल्या सौ. मानसी धुरी यांचे आभार मानले. गेली कित्येक वर्षांपासून हायमास्टची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. हायमास्थची मागणी पूर्ण झाल्याने रोणापाल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स