ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राज्यस्तरीय श्लोक पाठांतर स्पर्धेत बांदा केंद्रशाळेच्या सर्वज्ञ वराडकर व दुर्वा नाटेकर यांचे सुयश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राज्यस्तरीय श्लोक पाठांतर स्पर्धेत बांदा केंद्रशाळेच्या सर्वज्ञ वराडकर व दुर्वा नाटेकर यांचे सुयश.

प्रकाशन: 01 Feb 2022 01:13 AM
वाचन संख्या 30

बांदा | राकेश परब : बालसंस्कार समूह, महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याला वाव मिळावा यासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्लोक पाठांतर स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा क्र. १ शाळेतील सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर व दुर्वा दत्ताराम नाटेकर या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय सुयश मिळवले असून त्यांना राज्यस्तरीय सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
बालसंस्कार समूहाद्वारे महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षक स्वखर्चातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम आँनलाईन स्पर्धात्मक स्वरूपात घेत असून या समुहाच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो विद्यार्थी सहभागी होत असतात.
बांदा शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन श्लोक पाठांतर स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,सरपंच अक्रम खान ,विस्तार अधिकारी दूर्वा साळगांवकर ,केद्रप्रमुख संदीप गवस ,मुख्याध्यापक सरोज नाईक यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन मिळाले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स