<em>बांद्यात नामस्मरण कार्यक्रम उत्साहात संपन्न</em>
बांदा |राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिर येथे आयोजित ‘नामस्मरण’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. बांद्यातील ज्येष्ठ भजनकर्मी गिरी महाजन यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी यात सहभागी होऊन नामस्मरण केले. यावेळी श्री विठ्ठल ऱखुमाई आणि शिवनामाचे नामस्मरण करण्यात आले. त्यानंतर प्रार्थना करुन सर्वांना प्रसाद वाटण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)