ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपाच्या सोशल मिडीया,आय.टी.सेल,ॲप संयोजक, वैद्यकीय आघाडी व दिव्यांग आघाडीची संयुक्त बैठक संपन्न.

भाजपाच्या सोशल मिडीया,आय.टी.सेल,ॲप संयोजक, वैद्यकीय आघाडी व दिव्यांग आघाडीची संयुक्त बैठक संपन्न.

प्रकाशन: 30 Jan 2022 10:48 PM
वाचन संख्या 59

भाजपा वैद्यकिय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डाॅ.अमेय देसाई यांचे मार्गदर्शन.

चिंदर | विवेक परब : भाजपा मध्ये सोशल मिडीयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने सात वर्षात घेतलेले जनकल्याणकारी निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मिडीयाची महत्त्वाची भुमिका आहे. असे प्रतिपादन भाजपा वैद्यकिय आघाडी प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांनी केले.भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात सोशल मिडीया, आय. टी.सेल, ॲप संयोजक, वैद्यकीय आघाडी व दिव्यांग आघाडीची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, आय्. टी.सेलचे केशव नवाथे, वैद्यकीय आघाडी चे डाॅ. गुरुनाथ गणपत्ये, दिव्यांग आघाडीचे अनिल शिंगाडे, सोशल मिडीयाचे विष्णू परब – अमेय धुरी, ॲप संयोजक योगेश घाडी, सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, सावंतवाडी सोशल मिडीयाचे केतन आजगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आय्. टी.सेलचे केशव नवाथे यांनी पक्षाच्या पोर्टल बाबत माहिती दिली .तसेच आय.टी. सेलच्या माध्यमातून कशाप्रकारे पक्षाचे काम सुरु आहे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनील शिंगाडे यांनी आतापर्यंत दिव्यांगासाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली.तसेच दिव्यांगांसाठी भविष्यात विविध उपक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले. सिंधुदुर्गातील ग्रामीण भागात ज्याठीकाणी तज्ञ डाॅक्टर उपलब्ध नसतात त्याठिकाणी जिल्ह्याबाहेरील तज्ञ डाॅक्टर आणुन वैद्यकीय शिबिरे घेण्याचा मनोदय वैद्यकीय आघाडी चे डाॅ. अमेय देसाई व डाॅ. गणपत्ये यांनी व्यक्त केला.तसेच सोशल मिडीया च्या माध्यमातून प्रत्येक बुथचा वाॅट्सअप ग्रुप बनवुन प्रत्येक ग्रुप मध्ये २५० लोकांना सहभागी करून घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, नगरसेवक प्रशांत आपटे, ता.चिटनीस समीर चिंदरकर, महिला मोर्चा च्या रसीका मठकर व वृंदा मोर्डेकर, युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, किसान मोर्चा चे बाळु प्रभु, दिव्यांग आघाडीचे शामसुंदर लोट – सदानंद पावले – विजय कदम , संतोष खानोलकर, ओंकार चव्हाण, दिवाकर कुर्ले इत्यादी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स