मसुरे येथील शांताराम परब यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे देऊळवाडा पन्हाळकर टेंब येथील रहिवाशी शांताराम जयराम परब (८१ वर्ष) यांचे निधन झाले. मसुरे देऊळवाडा येथील पोस्ट कार्यालय शाखेत पोस्टमन म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा केली होती. सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग होता. प्रेमळ स्वभावाने ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, तीन मुलगे, एक मुलगी, पुतणे, पुतणी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील प्रवीण,शेखर व किशोर परब यांचे ते वडिल होत. श्री.शांताराम परब यांच्या निधनाने मसुरे व परिसरांत शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)