भरणी-तांबळवाडी-बादेवाडी रस्त्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ.
शिरगांव |संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील वरवडे – पिसेकामते – हुंबरणे – भरणी – कुवळे या ‘प्र.जि.मा. १४ मार्गावरील ७/३९० ते ९/२५०’ या भरणी तांबळवाडी – बादेवाडी या रस्त्यावरील टप्प्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सरपंच प्रकाश घाडी यांच्या हस्ते आणि पं. स.सदस्य गणेश तांबे सार्व.बांधकाम विभागाचे शाखा अभियंता .पी.व्ही.कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी तंटामुक्त समिती अध्यक्ष
अनिल बागवे,प्रभाकर गुरव,शामसुंदर जगताप,प्रवीण जगताप,गंगाराम ठुकरुल,वसंत पवार,श्री.कोळेकर, प्रकाश मेस्त्री, राजेंद्र राणे,रघुनाथ ठुकरुल,सुरेश गुरव,विनोद राऊळ व सोबतच बहुसंख्य ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)