महाड पूरग्रस्तांना भारतीय कामगार सेना एल अँड टी युनिट कडून मदत!
मसुरे | प्रतिनिधी :- भारतीय कामगार सेना एल अँड टी युनिट आणि व्यवस्थापनातर्फे महाड येथील पूरग्रस्तांना शिवसेना आमदार भारत गोगावले यांच्या उपस्थितीत मदतीचे वाटप करण्यात आले.यावेळी एल अँड टी युनिटचे अध्यक्ष तथा आंगणेवाडी चे सुपुत्र सुधा आंगणे, सरचिटणीस यशवंत सावंत, उपाध्यक्ष विनायक नलावडे, खजिनदार कृष्णकांत कदम, अमोल शिलिमकर, परवीन मोरे, शाहू कदम, आदेश दरेकर आदी उपस्थित होते. महापुरात नुकसान झालेल्या बांधवाना पुन्हा उभे राहण्यासाठी थोडीशी मदत एल अँड टी च्या माध्यमातून करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा हेतू यामागे असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष सुधा आंगणे यांनी यावेळी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)