चिंदर ग्रामपंचातच्यावतीने आयोजित स्वंयरोजगार मेळाव्याला उत्फूर्त प्रतिसाद..!
चिंदर ग्रामपंचायत, जिल्हा खादीग्रामोद्योग महामंडळ, बँक आँफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
चिंदर / विवेक परब :आपल्या गावातील बेरोजगार, बचतगट व युवा उद्योगजक यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व गावातील पुढची पिढी सक्षम व्हावी या उद्देशाने माजी तालुका सभापती धोंडी चिंदरकर यांच्या संकल्पनेतून व चिंदर ग्रामपंचायत, जिल्हा खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चिंदर ग्रामपंचायत येथे आज स्वंयरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार व नविन उद्योजक यांनी उपस्थित दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सौ. राजश्री कोदे व इतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाली. प्रास्तविक मा. धोंडी चिंदरकर यांनी केले तर सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी केले.मार्गदर्शन करताना जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी माननीय श्री. कर्णिक यांनी आपल्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आपण लघु व मध्यम उद्योग करण्यासाठी मदत व पूर्ण सहकार्य करु फक्त उद्योग करण्याची मानसीकता ठेवा असा सल्ला दिला.
त्यानंतर अनुक्रमे बँक आँफ महाराष्ट्रचे मिराशी , हडी सरपंच महेश मांजरेकर व नूतन जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी मार्गदर्शन केले. नूतन जिल्हा बँक संचालक बाबा परब यांचा यावेळी सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, स्वरा पालकर, सानिका चिंदरकर, खादी ग्रामोद्योगचे-प्रविण साळवी, संतोष भाईप, माळगाव सरपंच निलेश खोत, संतोष गांवकर, प्रकाश मेस्री, देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, आनंद पवार, अभय पाडावे एकनाथ पवार, मनिषा मसुरकर, दुर्वा चिंदरकर मोरेश्वर गोसावी, रणजित दत्तदास, विश्राम, आबा, अजित व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा समारोप ग्रामविस्तार अधीकारी श्री युवराज चव्हाण यांनी केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)