नाबर प्रशालेला भाजपा खासदार श्री गोपाल शेट्टी यांची सदिच्छा भेट.
बांदा | राकेश परब : श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई च्या व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा या प्रशालेला शुक्रवार दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी भाजपचे खासदार गोपाल शेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सौ. शेट्टी , श्री. राधाकृष्ण शहापुरकर ,सौ .शहापुरकर ,शंकर भानूशाली ,संस्थेचे प्रशांत कामत, मंदार कल्याणकर, स्कूल कमिटी सदस्य मनोज कामत, पंचायत समिती सदस्य शितल राऊळ, संदीप सावंत तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई आणि इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गोपाल शेट्टी यांच्या हस्ते कु. मधुरा पाटील , कु.राधाकृष्ण पावसकर, कु. हर्ष शिरोडकर, कु. अनुष्का पंडित या विद्यार्थ्यानी विविध स्पर्धांत राज्यस्तरावर यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . उपस्थित मान्यवरांनी प्रशालेच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)