ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा केंद्र शाळेच्या पाटील यांच्या नवोपक्रमाची सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड....!

बांदा केंद्र शाळेच्या पाटील यांच्या नवोपक्रमाची सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड....!

प्रकाशन: 21 Jan 2022 03:38 AM
वाचन संख्या 52

बांदा | राकेश परब : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने  २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी बांदा नं .१ केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जे .डी. पाटील यांच्या नवोपक्रमाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे मागील वर्षी देखील  पाटील यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती सलग दुसऱ्या वर्षी बांदा केंद्र शाळेतून त्यांच्या नवोपक्रमाची  निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.दरवर्षी उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, तसेच अंगणवाडी सेविका व अधिकारी वर्ग यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येते या मध्ये राज्यभरातील शेकडो शिक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात.         गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे यासाठी श्री पाटील यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने अनेक नाविन्यपूर्ण सहशालेय उपक्रम स्पर्धात्मक स्वरूपात राबविलेले आहेत या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्याबरोबर मूल्यांची जोपासना करून अध्ययन निष्पत्ती साध्य करण्या बरोबर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रक्रिया सुद्धा पार पाडली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली  असतानाही शाळेमध्ये लोकसहभागातून सहा लाखांहून अधिक लोकसहभाग मिळून शाळेची पटसंख्या तीनशेहून अधिक पार केली आहे तसेच शाळेचे विद्यार्थी विविध ऑनलाईन स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होऊन जिल्हा व राज्य पातळीवर यश संपादन करत आहेत पाटील यांनी राबवलेल्या उपक्रमाची दखल घेऊन हा उपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे या यशाबद्दल सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके ,विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर ,केंद्रप्रमुख संदीप गवस, बांदा सरपंच अक्रम खान ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर,मुख्याध्यापक सरोज नाईक व शिक्षक मित्र परिवार व बांदा ग्रामस्थ यांचेकडून अभिनंदन करून राज्यसतरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या नवोपक्रमासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख ,डाएटचे प्राचार्य ए .पी तावशीकर ,अधिव्याख्याता डाॅ. लवू आचरेकर आदींचे मार्गदर्शन लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स