तरुण पिढीला भविष्य घडविण्यासाठी दिशादर्शक पुस्तक!; गिरीश सावंत यांचे प्रतिपादन "आजचा दिवस फक्त" पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भारतीय कामगार सेना, एल ॲण्ड टी युनिटच्या वतीने, पवई येथील कंपनीच्या सभागृहातया कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कामगार रमेश सांगळे यांनी स्वानुभवावर स्वतः लिहिलेले “आजचा दिवस फक्त” व्यसनमुक्तीची संघर्षगाथा या पुस्तकाच्या प्रकाशना निमित्त त्यांचा सत्कार युनिट अध्यक्ष नारायण आंगणे व हेवी इक्वीपमेंटचे जनरल मॕनेजर गिरिश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावंत म्हणाले की, सध्याच्या तरूण पिढीकडे संयम नाही. जे नातेसंबंध दूर ठेवून, प्रेम आणि झटपट यश शोधत आहेत. त्यांना हे पुस्तक व्यसनांना दूर ठेवून, संघर्ष, चिकाटी, बिकट परिस्थितीत आशा, तसेच आयुष्यातील लावचिकता या बाबतीत मार्गदर्शक ठरेल. तसेच व्यसनाधीनांना व्यसनापासून परावृत्त होऊन, जीवन जगण्यासाठी ज्याचा अभिमान बाळगावा असे अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत. यामुळेच तरुण पिढीला भविष्य घडवण्यासाठी हे पुस्तक खरोखरच दिशादर्शक ठरेल. असे मनोगत युनिट जनरल सेक्रेटरी यशवंत सावंत यांनी व्यक्त केले.कामगार बंधूंनो व्यसनी होण्यापेक्षा, निर्व्यसनीच राहा. असा मोलाचा सल्ला रमेश सांगळे यांनी या प्रसंगी दिला.या सत्कार सोहळ्यासाठी व्यवस्थापनाचे वरिष्ठ डीजीएम अजित पंडीतराव, डीजीएम हरेष महाडीक तर मिरॕकल फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष मनराय, प्रकाशिका मोहिनी कारंडे, संविधान प्रचारक माधुरी सोनावणे याचप्रमाणे भारतीय कामगार सेना एल ॲण्ड टी युनिटचे सर्व पदाधिकारी, सर्व समिती सदस्य उपस्थित होते. या सोहळ्याचे नियोजन शाहू कदम, सी डी पाटील, प्रशांत भोईर, अजय बारस्कर यांनी केले होते. तर सूत्रसंचालन राजेश तांबडे यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)