भाजपा वेंगुर्ले च्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
वेंगुर्लै /विवेक परब : मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अनुदगार काढल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करणेबाबत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी देशाच्या पंतप्रधानांना अशा पध्दतीने बोललेले भाजपा सहन करणार नाही, तसेच नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने दिला. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, नगरसेविका श्रेया मयेकर व कृपा मोंडकर, परबवाडा सरपंच पपु परब, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर , महिला मोर्चा च्या रसीका मठकर व आकांक्षा परब , युवा मोर्चा चे भुषण सारंग , शैलेश मयेकर व ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)