ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
प्राथमिक शिक्षक पतपेढीने कर्जावरील व्याजदर कमी करावे
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

प्राथमिक शिक्षक पतपेढीने कर्जावरील व्याजदर कमी करावे

प्रकाशन: 19 Jan 2022 03:19 PM
वाचन संख्या 108

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गची मागणी

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी ही पगारदार पतसंस्था असून आदरणीय संस्थापक द . सि .सामंत गुरुजीनी शिक्षकांच्या अडचणी व आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही पतपेढी सुरु केली आहे .सद्यस्थितीत संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली असून पतपेढी क्लिन कॅशक्रेडिट मुक्त झालेली आहे,असे असतानाही शिक्षक सभासदांना मात्र दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याज दरात कपात करण्यात आलेली नाही .आपली पतपेढी ही कामधेनू आहे.तिची पत जनमाणसात राहावी यासाठी संस्थेच्या विश्वस्त यांच्या कारभारावर विश्वास ठेवून सर्वसामान्य सभासद आहेत व राहणारही आहेत .परंतु इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांकडून पगारदार कर्मचाऱ्याना कमी व्याज दराने कर्ज उपलबध करून दिले जाते परंतु अनेक वार्षिक अधिमंडळ सभांमध्ये सातत्याने मागणी करूनही आजपर्यंत जामिनतारण कर्ज व्याजदरात कपात करण्यात आली नाही हे धोरण सर्वसामान्य सभासदांवर अन्याय करणारे आहे त्यामुळे कर्जावरील व्याज दर कमी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री संतोष पाताडे व सचिव श्री अरुण पवार यांनी केली आहे.
प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. जामीनतारण कर्ज व्याज दर आठ टक्के करावा.
स्पेशल जामिनतारण कर्ज व्याज दर ९ % करावा.
नफ्याच्या योग्य प्रमाणात पतपेढी कर्मचारी याना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स