ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्राथमिक शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होणे हे अभिमानास्पद......बाबाजी भिसळे!

प्राथमिक शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होणे हे अभिमानास्पद......बाबाजी भिसळे!

प्रकाशन: 19 Jan 2022 10:11 AM
वाचन संख्या 239

🔸 साहित्यिक बाबू घाडीगांवकर यांच्या वणवा कथासंग्रहाचे चिंदर दत्तमंदिर येथे प्रकाशन

आचरा /विवेक परब : प्राथमिक शिक्षक हा मूळातच साहित्यिक असतो. मात्र अशा प्राथमिक शिक्षकाचे साहित्यविषयक पुस्तक प्रकाशित होणे ही समस्त शिक्षणप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त शिक्षक बाबाजी भिसळे यांनी कोकणातील प्रथितयश साहित्यिक व शिक्षक बाबू घाडीगांवकर यांच्या ‘ वणवा ‘ या मराठी लघुकथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी केले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा- मालवण, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा- मालवण , श्री दत्तमंदिर सेवा मंडळ, चिंदर गांवठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणचे भाग्यविधाते बॅ. नाथ पै यांच्या एकावन्नव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात बॅ. नाथ पै यांना अक्षरस्वरूप आदरांजली म्हणून कोकणातील प्रथितयश साहित्यिक तथा शिक्षक बाबू घाडीगांवकर लिखीत ‘ वणवा ‘ या मराठी लघुकथासंग्रहाचे समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा- मालवणचे सचिव पांडुरंग कोचरेकर, चिंदर गावच्या सरपंच राजश्री कोदे, सेवानिवृत्त अधिकारी सुरेंद्र सकपाळ, जनता विद्या मंदिर, त्रिंबकचे मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, ज्येष्ठ कवी, गझलकार तथा शिक्षक एकनाथ गायकवाड, श्री दत्तमंदिर देवस्थान अध्यक्ष स्मिता पाटील, चिंदर ग्रामपंचायत सदस्य दूर्वा पडवळ, सेवानिवृत्त शिक्षिका अर्चना बागवे, मंदार सांबारी, मालवणी कवी भूषण दत्तदास, पत्रकार विवेक राजू परब, दिनेश पाताडे, संजू सामंत, मधुकर पवार, विनायक मसुरकर, मानसी पाताडे, हर्षाली कानविंदे, रक्षा चिंदरकर, रुचिरा चिंदरकर, गौरव-लावण्या दत्तदास, रेशम पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बॅ. नाथ पै यांच्या जीवनचरित्रावर सुरेश ठाकूर यांनी सविस्तर विवेचन केले व बॅ. नाथ पै यांच्या जीवनातील काही अविस्मरणीय प्रसंग कथन केले. याच कार्यक्रमात बॅ. नाथ पै यांना अक्षरस्वरुप आदरांजली म्हणून कोकण मराठी साहित्यज परिषद शाखा- मालवणचे सदस्य असलेल्या बाबू घाडीगांवकर यांच्या ‘ वणवा ‘ या मराठी कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. एकूण वीस लघुकथांचा सामावेश असलेला हा कथासंग्रहात कोकणातील समाजजीवन व लोकजीवन अधोरेखित करण्यात आले आहे. या कथासंग्रहातील प्रत्येक कथेत कोकणातील लोकजीवनाचे प्रतिबिंब दिसते असे विवेचनही या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या बाबाजी पिसळे यांनी केले. याप्रसंगी एकनाथ गायकवाड व प्रविण घाडीगांवकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र सकपाळ यांनी केले तर एकनाथ गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स