कट्टा येथे बॅ. नाथ पै पुण्यतिथी साजरी!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत बॅ नाथ पै यांची ५१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कट्टा सेवांगणचे अध्यक्ष किशोर शिरोडकर यानी बॅ. नाथ पै यांच्या जीवनातील बेळगाव सीमा लढयातील प्रसंग यावेळी कथन केला. थोर संसंदपटू व उत्कृष्ट वक्ता असणारे नाथ पै माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते असे प्रतिपादन केले.दीपक भोगटे यानी कोरोनामुळे आजचा कार्यक्रम साधेपणाने साजरा केला असल्याचे सांगून बॅ नाथ पै स्मृतिदिना निमित्ताने होणारे पुरस्कार वितरण व पारितोषिक वितरण कार्यक्रम करोना संपल्यावर आयोजित करणार असल्याचे सांगितले.यावेळी किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बाळ महाभोज,यशवंत भोजणे,बाळा वाईरकर, अण्णा गुराम, भालचंद्र काराणे, शाम पावसकर, विजया ढोलम, राजन म्हाडगुत, सुरेश परुळेकर, सुजाता पावसकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)