वेंगुर्ले हायस्कूल च्या १९९३ सालच्या एस.एस.सी.बँच चा उपक्रम स्तुत्य
माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे
वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला मधील १९९३ सालच्या एस.एस.सी बँच च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल आत्मियता व कुत्यज्ञता व्यक्त करत बेंच प्रधान कार्यक्रम २९ वर्षानंतर शाळेत येऊन केला. हा त्यांचा उपक्रम खरचं स्तुत्य असल्याचे प्रतिपादन वेंगुर्ले हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे सर यांनी बेंच प्रधान कार्यक्रमता बोलताना केले.ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळेचे माजी पर्यवेक्षक, शा.हु.शेख, माजी शिक्षक शरद पुराणीक, एस.व्ही.सम्रुद्रे, वुंदा कांबळी, परब मँडम, सध्याचे कार्यरत मुख्याध्यापक पी.डी.कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
बोलताना एस.एस. काळे म्हणाले की तब्बल ऐकोंतीस वर्षानंतर या माजी विद्यार्थ्यांनी आपले शाळेवर प्रेम व्यक्त करत शाळेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखूण दहा सुंदर बेंच सुपुर्द केले. या बँच चा आदर्श या अगोदरच शिकून गेलेल्या बँच ने घेतला तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा पुर्ण होतील हे निश्चितच वाटते. शाळेचे माजी पर्यवेक्षक का.हु.शेख यांनी ही माजी विद्यार्थ्यांनी छान प्रकार उपक्रम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. माजी शिक्षिका वुंदा कांबळी यांनी ही माजी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. माजी शिक्षक शरद पुराणीक, एस.व्ही समुद्रे, सध्याचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे, माजी विद्यार्थी अनंत परब, राकेश परब यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवात सर्वप्रथम प्रार्थनेने झाली त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित गुरुवर्य यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. माजी शिक्षकांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेतील शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षकेतर प्रतिनिधी यांचे ही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी मनिषा पालव,ललिता फाटक, अमिना कुन्नत, केदार आंगचेकर, प्रसाद मराठे, बाळा आरांवदेकर, संजु फर्नांडिस, विवेक नाईक, नरेंद्र नाईक, विलास परब, सुधीर गावडे,हेमंत चव्हाण, शैलेश सातार्डेकर, निलेश गंगावणे, प्रभाकर देऊलकर, आनंद परब, विनोद परब, यशवंत उर्फ बली नाईक, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, दहावी इयत्तेत मधील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुमन परब हीने, प्रास्ताविक राकेश परब यांनी तर आभार सामंत सर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)