ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
या परीक्षेच्या तारखेत होणार बदल!

या परीक्षेच्या तारखेत होणार बदल!

प्रकाशन: 15 Jan 2022 03:54 PM
वाचन संख्या 35

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारी रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (म्हणजेच इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (म्हणजेच इयत्ता आठवी) २०२२ संदर्भात परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज (आवेदनपत्र)भरण्यासाठी १ ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु आता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स