जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश पाडावे यांचे निधन
मसुरे (प्रतिनिधी): मुणगे कारीवणेवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश सखाराम पाडावे ( ७५ वर्ष) यांचे मुंबई येथे निधन झाले. गेली अनेक वर्षे ते वाडीतील मंडळाचे अध्यक्ष होते. विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन विवाहित मुली, सुना, जावई, भाऊ, वहिनी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. संतोष व केशरीनाथ पाडावे यांचे वडील तर श्री भगवती देवस्थान कमिटी सदस्य सुधीर पाडावे यांचे काका होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)