ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रस्ता दुरावस्थे बाबत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने वेधले लक्ष!

रस्ता दुरावस्थे बाबत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने वेधले लक्ष!

प्रकाशन: 15 Jan 2022 01:25 PM
वाचन संख्या 109

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण कसाल रस्ता तसेच कुंभारमाट जरीमरी उतार रस्ता आणि फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोटपर्यत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे उपअभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सदर रस्ता जागोजागी खड्डे पडून पूर्णपणे खराब झालेला आहे.त्यामुळे वाहन चालकांना तसेच प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.वाहन चालकांच्या व प्रवाशांच्या या जीवघेण्या खेळाची वेळीच दखल घेऊन सदरच्या मार्गाचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा सनदशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स