पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पने खाली पळसंब येथे वनराई बंधारे बांधण्यास शुभारंभ
🔴 सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांचे विविधांगी उपक्रम
आचरा/विवेक परब— आज ग्रामपंचायत पळसंब कार्यक्षेत्रात पळसंब बौद्धवाडी येथे पाणी टंचाईचे संकट लक्षात घेता पाणी अडवा पाणी जिरवा च्या माध्यमातून वनराई बंधारा ग्रामपंचायतच्या वतीने बांधण्याचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये अजून पाच बंधा-याचे काम काहीच दिवसात होणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री .चंद्रकांत गोलतकर ,ग्रामसेवक श्री.अमित कांबळी, ग्रामपंचायत सदस्य श्री.अरुण माने, कृषिसेवक श्री.कुरकुटे, श्री.शैलेंद्र अनावकर, श्री.अमित पुजारे, हृतिक पुजारे , मनीष पुजारे, शेखर पुजारे, प्रणय पुजारे, दर्शन पुजारे, गुरू साटम आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)