ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
"आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे" ठाकर आदिवासी कला आंगण, पिंगुळी येथे आयोजन..!

"आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे" ठाकर आदिवासी कला आंगण, पिंगुळी येथे आयोजन..!

प्रकाशन: 07 Jan 2022 05:50 PM
वाचन संख्या 72

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या ‘सांस्कृतिक मंत्रालय तर्फ़े तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंन्द्र नागपुर ‘,यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी अध्यक्ष श्री. परशुराम विश्राम गंगावणे यांच्या कला आंगण मध्ये उद्या दिनांक ८/१/२०२२ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या रांगोळी स्पर्धेसाठी वय वर्षे १० वरील व्यक्ति सहभागी होऊ शकतील.
या रांगोळी स्पर्धेसाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’,हा विषय असुन स्पर्धकांनी  ऑनलाईन नोंदणीसाठी श्री. चेतन परशुराम गंगावणे मोबाईल नं. 9987653909 या नंबर वर  नोंदणी करावयाची आहे.
ही स्पर्धा जिल्हा पातळीवरील असुन केंद्र सरकारच्या वतिने या स्पर्धेचे आयोजन पिंगुळी येथे करण्यात आलेले आहे.  सदरची स्पर्धा ऑनलाईन असुन स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहे.
प्रथम नावे नोंदणी करणा-या व्यक्तींना यावेळी प्राधान्य देण्यात येईल.तसेच या रांगोळी चे प्रदर्शन सायंकाळी ४.०० ते ७.०० पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
अधिक माहितीसाठी संपर्क श्री.चेतन परशुराम गंगावणे ,मोबाईल क्रमांक 9987653909 ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरी
पिंगुळी,इथे संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स