ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर पालकरवाडी शाळेतील विद्यार्थिनी कु. दुर्गा श्रीपाद म्हापसेकर हिची नवोदय विद्यालयसाठी निवड

चिंदर पालकरवाडी शाळेतील विद्यार्थिनी कु. दुर्गा श्रीपाद म्हापसेकर हिची नवोदय विद्यालयसाठी निवड

प्रकाशन: 04 Jan 2022 09:41 AM
वाचन संख्या 221

आचरा/ विवेक परब : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर पालकरवाडी, ता-मालवण शाळेची विद्यार्थिनी दुर्गा श्रीपाद म्हापसेकर हिने जवाहर नवोदय परीक्षा http://localhost/news/public/uploads/2021 मध्ये उज्वल यश संपादन केले असून सांगेली तालुका सावंतवाडी येथे इयत्ता सहावी साठी तिची निवड झाली आहे. लहान पणा पासूनच हुशार असणाऱ्या दुर्गा हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वर्गशिक्षक श्री शिवानंद ह.सोलापुरे व श्री नंदकुमार जुंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने परीक्षेचा कसून सराव केला. तिच्या या यशाबद्दल मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने साहेब, विस्ताराधिकारी श्री.उदय दिक्षित, केंद्रप्रमुख श्री.प्रसाद चिंदरकर, सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्राम पंचायत सदस्य सौ.स्वरा पालकर, शाळा व्यव.स.अध्यक्ष सौ.दिक्षा पालकर, शिक्षण प्रेमी श्री रविंद्र लब्दे, शेखर पालकर, सौ.मनवा मिलिंद चिंदरकर व चिंदर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स