ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
पत्रकार संघाने केली तहसीलदार कार्यालय परिसराची केली साफसफाई
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पत्रकार संघाने केली तहसीलदार कार्यालय परिसराची केली साफसफाई

प्रकाशन: 23 Dec 2021 04:27 PM
वाचन संख्या 71

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) :कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने तहसीलदार कार्यालय परिसरातील स्वच्छता मोहिम गुरूवारी राबविण्यात आली.तालुका पत्रकार समिती सदस्य , तहसीलदार आर . जे . पवार व तहसील कर्मचारी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले आहे.
गुरुवारी सकाळी सुमारे अडीज तास राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत तहसीलदार कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली . तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्यानुसार गुरूवारी सकाळी ८ वा . पासून या मोहिमेची सुरूवात करण्यात आली . यावेळी तहसीलदार आर . जे . पवार , पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे , नगरसेविका मेघा गांगण , जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे , तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई , तालुका सचिव संजय राणे , खजिनदार नितीन कदम , ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर , अशोक करंबेळेकर , जि . कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे , माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत भावे , भगवान लोके , संतोष राऊळ , मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील , तलाठी सुवर्णा कडूलकर , कर्मचारी रमेश कांबळे , रणजित चौगुले , महादेव बाबर , मनोज आव्हाड , राजेश चौगुले , बापू जाधव , तसेच बंडू गांगण , सुशिल पारकर , प्रसाद अंधारी , प समितीचे संजोग सावंत , तुषार सावंत ,जेष्ठ पत्रकार भालचंद्र साटम , दिलीप हिंदळेकर,
भास्कर रासम , गुरुप्रसाद सावंत , संजय पेटकर , विरेंद्र चिंदरकर , सचिन राणे , हेमंत वारंग , मिलींद पारकर , नंदादीप सावंत , विराज गोसावी , उमेश बुचडे , अनिकेत उचले , तुषार हजारे , दिलीप जाधव , प्रदीप राणे , चंद्रशेखर तांबट , संजय बाणे , संतोष जोगळे , विवेक ताम्हणकर , शशिकांत सातवसे व इतर सहभागी झाले होते.नगरसेविका मेघा गांगण यांनी उपस्थिती लावली होती.
आर . जे . पवार म्हणाले , ज्यावेळी परिसर स्वच्छ असतो , त्यावेळी कामाचा हुरूप येतो . अशाच प्रकारचे विधायक काम पत्रकारांच्या माध्यमातून होत आहे . शासकीय निधीवर अवलंबून न राहता , अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविण्याचा आमचाही प्रयत्न राहिल . अशा उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्यही राहिल . सौ . गांगण म्हणाल्या , सामाजिक बांधीलकीतून समाजाच्या हिताचे उपक्रम राबविले जातात . याचे उदाहरण पत्रकार बांधवांनी दिले असून परिसर स्वच्छतेसाठी पत्रकारांच्या या उपक्रमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन भविष्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून असे उपक्रम राबविले जातील . तसेच यासाठी नगरपंचायतीचे सर्व सहकार्य राहिल . गणेश जेठे म्हणाले , तालुका पत्रकार समितीचा हा उपक्रम इतरांनी आदर्श घ्यावा , असाच आहे . या उपक्रमाचे आम्ही कौतुक करतानाच इतरांनीही याचा आदर्श घ्यावा , असे आवाहन त्यांनी केले . तर या उपक्रमात सहभागी झालेल्या तहसीलदार आर . जे . पवार , मेघा गांगण , नगरपंचायत कर्मचारी , तहसील कर्मचारी , पत्रकार संघाचे सदस्य यांचे तसेच सहकार्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आभार तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी मानले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स