सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग आवाहन.
ओरोस /प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान महाडिबिटी प्रणालीवरील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन http://localhost/news/public/uploads/2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता -https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज महाडिबीटी पोर्टल 14 डिंसेबर http://localhost/news/public/uploads/2021 पासून सुरू झालेले आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज दि.31 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत भरण्यासाठी सुचित करावे. तसेच सन http://localhost/news/public/uploads/2020-21 मधील नुतनीकरणाचे अर्ज व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे शिष्यवृत्तीचे अर्ज करण्याची अंतिम दि. 31 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2022 आहे.
जिल्ह्यातील सर्व संस्था व महाविद्यालय स्तरा वरील अर्ज विहीत वेळेत या कार्यालयास वर्ग झाले नाहीत व संबंधित मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी,असे आवाहन समाज कल्याण विभगाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)