ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
धक्का मित्रमंडळ मालवणतर्फे चौथे रक्तदान शिबीर संपन्न.

धक्का मित्रमंडळ मालवणतर्फे चौथे रक्तदान शिबीर संपन्न.

प्रकाशन: 12 Aug 2021 12:11 AM
वाचन संख्या 61

मालवण | प्रतिनिधी : कोविड काळानंतर समाजातील सर्वात अत्यावश्यक सेवा म्हणून रक्तदान ही गरज ओळखून मालवणमधील धक्का मित्रमंडळाने रक्तदान शिबिरे ही गरज ओळखली. ओरोस येथील शासकीय रक्तपेढीची रक्ताची मागणी लक्षात घेऊन धक्का मित्रमंडळाने आयोजित केलेल्या चौथ्या रक्तदान शिबिराचे उदघाटन मालवणचे डॉ कपिल मेस्त्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि  मालवणच्या हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिरात ७० रक्त दात्यांनी सहभाग घेतला.
         मालवणच्या सामाजिक क्षेत्रात नव्याने कार्यरत असलेल्या धक्का मित्रमंडळाने गेल्या काही महिन्यापासून ओरोस रक्तपेढीची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचा धडाका लावला आहे. आज दैवज्ञ भवन येथे झालेल्या रक्तदान शिबिरात युवक युवतींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग दर्शवला. कोरोना व्हायरसमुळे रक्ताची आवश्यकता भासत असल्याने तसेच लॉकडाऊन मुळे रक्तदान शिबिरे होत नसल्याने रक्ताची समस्या भेडसावू लागली आहे आणि म्हणूनच धक्का मित्रमंडळाने घेतलेल्या ह्या शिबिराविषयी सर्वांनी कौतुक केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. प्रफुल्ल साळुंखे, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, मुख्याधिकारी संतोष जिरगे, मुकेश बावकर, प्रसाद आचरेकर, कैलास ढोले, हेमंत शिरगावकर, बाबू डायस, संजय गावडे, गौरेश कांबळी, देवदत्त तोडणकर, भूषण पिसे, रोहित चव्हाण, विकास पांचाळ, आदिती रेवंडकर, मयु पारकर आदी व इतर उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी निलेश जाधव, रोहित चव्हाण, नितीन कोटियान, आशीष घाडीगांवकर, अनिकेत मयेकर, अनिकेत चव्हाण, छाया कांबळी, ललित चव्हाण, मनीष कांबळी, सुरेश नायडू, भालचंद्र आपकर, अस्लम अथनिकर, प्रज्ञेश चव्हाण आदींनी अथक परिश्रम घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 331

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स