ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
तौक्ते वादळाच्या पंचनाम्यांवर भाजपची टीका..!

तौक्ते वादळाच्या पंचनाम्यांवर भाजपची टीका..!

प्रकाशन: 12 Aug 2021 12:14 AM
वाचन संख्या 50

मालवण | प्रतिनिधी : तौक्ते चक्रीवादळतील ज्या नुकसान ग्रस्तांचे पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नाही अशा लोकांना येत्या दोन दिवसात अनुदान देण्यात येईल असे आदेश प्रशासनाला दिल्याचे वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मुळात तौक्ते वादळ होऊन प्रदीर्घ कालावधी उलटूनही वैभव नाईक यांना हे जाहीर करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या मालवण तालुक्यातील देवबाग दौऱ्याची वाट बघावी लागल्याची खरमरीत टीका मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.
         मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की मुळातच तौक्ते वादळ नुकसान भरपाई साठी पंचनामे करताना काही ठराविक लोकांपुरतेच केल्याची तक्रार देवबाग ग्रामस्थानी अध्यक्ष संजना सावंत यांच्याकडे केल्यावर अध्यक्ष यानी या तक्रारीच्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात देवबाग गावाला भेट देऊन सर्व प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन लोकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशा सुरुवात केली त्यामुळे ज्यांना खरोखरच नुकसान भरपाई मिळणे आवश्यक होते त्यांना मिळाली नसल्याचे व जिथे घर नसतानादेखील घर असल्याचे दाखवून नुकसान भरपाई लाटल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळेच नियमबाह्यपणे देण्यात आलेली नुकसान भरपाई व ज्यांना खरोखरच गरज आहे असे लोक वंचित राहिल्याने याबाबतचा पर्दाफाश करून अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत या आवाज उठवून गरजूना नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याची गोष्ट निश्चित झाल्यानंतर वैभव नाईक यांनी या विषयात उडी घेतली आणि म्हणूनच कधी न येणारे वैभव नाईक मालवण पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या भेटीसाठी आले. त्यामुळे वैभव नाईक यानी हे दिखाऊगिरीचे काम बंद करावे असे नमूद करून त्यांनी पत्रकात म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते यांच्या माध्यमातूनच या देवबाग वासियांच्या समस्या दूर करण्यात येणार असून अध्यक्ष यांच्या प्रयत्नातूनच अशा वंचित राहिलेल्या २२२ कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात येणार आहे व नुकसान भरपाई वाटपात झालेली अनियमितता देखील जनतेसमोर आणणार असल्याचे स्पष्ट  केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स