इन्सुलीचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा जत्रौत्सव २१ डीसेंबर रोजी
बांदा / राकेश परब : इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार २१ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी देवीची पूजाअर्चा व अभिषेक होईल. श्री देवी माऊली दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती, मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)