ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री बांदेश्वर भुमिका  देवस्थानचा  जत्रोत्सव उत्साहात
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा जत्रोत्सव उत्साहात

प्रकाशन: 20 Dec 2021 09:42 AM
वाचन संख्या 24

बांदा /राकेश परब :  बांदा येथील प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. हजारो भाविकांना श्री बांदेश्वर भुमिका पंचायतन देवतांचे दर्शन घेतले.जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते.

रविवारी सकाळी श्री बांदेश्वर श्री भुमिका मंदिरात पुजा अर्चा होऊन दर्शनास तसेच श्री भुमिका माऊली ओटी भरणे,नवस बोलणे,नवस फेडणे आदी कार्यक्रमांना आरंभ झाला. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरात फुलांची सजावट तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसर जत्रेची दुकाने व लोकांच्या गर्दीने फुलुन गेला होता. रात्रौ श्रींचा मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा ,वार्षिक नित्य पुराण वाचन कार्यक्रमाची सांगता तसेच जत्रोत्सवानिमित्त नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी  समाराधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रोत्सवापासुन दर सोमवारी होणाऱ्या पालखी सोहळ्याचा शुभारंभ झाला आहे.

Article image
Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स