ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आरोपींनी हल्ला केल्याची दिली कबुली
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आरोपींनी हल्ला केल्याची दिली कबुली

प्रकाशन: 19 Dec 2021 07:42 PM
वाचन संख्या 127

शिवसैनिक संतोष परब यांच्या हल्लेखोरांना पाच दिवसांची कोठडी

कणकवली / उमेश परब – जिल्हा बँक सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख , शिवसैनिक संतोष परब यांच्यावर काल चाकु हल्ला झाला होता,याप्रकरणी चार जणांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता २३ डिसेंबर पर्यत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.हा गुन्हा संवेदनशील असल्याने यातील आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत , आरोपींनी हल्ला केल्याची दिली कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक,तपासी अधिकारी सचिन हुंदळेकर यांनी दिली.दरम्यान या घटनेचा तपास करताना अत्यंत गोपनीयता पोलीस विभाग ठेवताना दिसत आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब याच्यावर १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चाकू सदृश्य टोकदार हत्याराने जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील चारही आरोपींना ताब्यात घेत इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केली होती. या हल्ल्यातील मुख्य आरोपी अद्याप पसार आहे,तसेच हे आरोपी पुणे कनेक्शन असल्याचे समजते , हे सर्वही आरोपी सराईत असण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यादृष्टीने पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स