'के.जे.एम' एक सत्वसंगीत आनंद..! (संपादकीय विशेष)
संपादकीय विशेष
सुयोग पंडित | संपादकीय विशेष: डिजिटल समूह यांच्याकडे आभासी समूह म्हणून पाहिले जाते. त्यामधील बहुतांशी कोणतीच कृती,स्थिती अथवा व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी शाश्वत मानल्या जातातच असे नाही.
अर्थात त्यामागे अदृश्य माणुसदूरी जपणे ही मनाची सावध इच्छा असणे ही गोष्ट गैरही नाही.
कलेच्या प्रांताबाबतीत म्हणायचे तर ऑनलाईन समूह ही बहुतांश संपूर्ण हौशी अशी संकल्पनाच आहे. अशातच लाॅकडाऊन काळामध्ये काही एकटे दुकटे गायक, गायिका त्यांच्यात्यांच्यापरीने रियाज़ आणि गायनाचा आनंद घेताना दिसत होते. परंतु त्यातही व्यावसायिकता अशी नक्कीच भरीवपणे समोर येऊ शकत नव्हती. कराओके हा संगीत प्रकार म्हणजे फार काही अवघड नाही अशीच सामान्य रसिकाचीही समजूत होणे गैर नव्हते कारण बहुतांश कराओके गायक हे हौस म्हणून गात स्वतःसोबत मित्रमैत्रिणींचे मनोरंजन करतायत असे चित्रही स्पष्ट होते.
या दरम्यानच मुंबईतील काही जणांचा के.जे.एम.(K.J.M.) नावाचा एक समूह फेसबुक पेजद्वारा लाईव्ह कार्यक्रम करत होता. प्रथमदर्शनी केवळ उत्तर भारतीय किंवा परदेशस्थीत भारतीयांचा एक हौशी समूह असे त्या समूहाबद्दल सामान्य गायन रसिक श्रोत्याचे मत बनणे स्वाभाविक होते. परंतु जसजसे त्या समूहाचे कार्यक्रम वाढत गेले तसतसे त्यातील सत्व,सभ्यता व व्यावसायिक कळत गेली.
जीवन कोहली,मुश्ताक ख़ान,राकेश कन्सारा, मधुरा वर्तक, संदीप कपाडिया, उमा कपाडिया वगैरे भयंकर दिग्गज व्यावसायिक गायक सामान्य श्रोत्यांसमोर येऊ लागली.
जीवन कोहलीनामक एक सुसज्ज व सुसभ्य व्यावसायिक व्यक्तिमत्त्व अनेक प्रकारे व्यक्तिमत्त्व विकास घडवू शकेल असेच आहे.
नुसती कला भरलेली माणसे इथे नाहीत तर सोबत सामाजिक जाणीव, जबाबदार सादरीकरण आणि प्रसन्न संवादशैलीने भारलेले कलावंत गायक इथे आहेत.
के.जे.एम.चे वार्षिक स्नेहसंमेलन मुंबईत नुकतेच पार पडले. वर्षभर श्रोत्यांना भरभरुन देणारे हे कलेचे सेवक त्याही दिवशी जबाबदारीने गायले पण थोडे मुक्तपणे..!
के.जे.एम.चे यश हे फक्त यश नसून सुयशाची एक कमानच म्हणता येईल.
आज कलेच्या प्रांतातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी के.जे.एम.एक विद्यापीठ आहे…नुसते कलेचे नाही तर आदर्श सामाजिक वर्तणुकीचेही!
सुयोग पंडित (मुख्य संपादक /आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)