ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीतील सांगुळवाडी रंगणार त्रिगुणात्मक भक्तीच्या श्रीदत्त सोहळ्यात..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडीतील सांगुळवाडी रंगणार त्रिगुणात्मक भक्तीच्या श्रीदत्त सोहळ्यात..!

प्रकाशन: 14 Dec 2021 09:06 PM
वाचन संख्या 231

सोळा डिसेंबरपासून दत्त मठात अनेक अध्यात्मिक कार्यक्रमांचे झालेय आयोजन.

सोहळ्यातील कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्टच्या वतीने झाले सात्विक आवाहन.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीतील सांगुळवाडीत श्री दत्त जयंती निमित्त  दत्त मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त जन्म सोहळ्यानिमित्त तीन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट सांगुळवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
दत्त जयंती सोहळ्याला सोळा डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे. दिनांक १६ आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस धार्मिक विधी होणार आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी ८.३० वा. पुजा पाठ, दुपारी १.२० वा. महाआरती, दु. १.३०वा महाप्रसाद, रात्री ८ वा. महाआरती व रात्री ८.३० वा. नंतर संगीत व वारकरी भजने होणार आहेत. शनिवार दि. १८ रोजी सकाळी ८.३० वा. पुजापाठ, सकाळी १०.३० दत्तयाग होमहवन, दु. १.२० महाआरती, दु. १.३० महाप्रसाद, सायं. ५.१५ ला दत्तजन्म व्याख्यान, सायं. दत्त जन्म उत्सव, रात्री ८.३० महाआरती, रात्री ९ वा. पालखी मिरवणूक काढली जाणार आहे..


या सोहळ्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे रात्री १० वा. जोगेश्वरी येथील बुवा प्रतिक रावराणे विरुद्ध डोंबिवली मधील बुवा संजय पवार यांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी भजनाचा रंगतदार सामना होत आहे.
श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट सांगुळवाडी यांच्यावतीने सदर माहिती देण्यात आली आहे. या पारंपारिक सोहळ्याकडे अवघी सांगुळवाडी व दत्तभक्त उत्सुक असल्याचे श्रद्धात्मक चित्र सध्या वैभववाडीतील व सांगुळवाडीत दिसत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स