ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विनोद कदम आदर्श पदवीधर शिक्षक पुरस्काराने सन्मानित!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विनोद कदम आदर्श पदवीधर शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

प्रकाशन: 12 Dec 2021 08:14 PM
वाचन संख्या 41

मालवण पंचायत समितीच्या वतीने पुरस्काराचे वितरण……

आचरा | अनिकेत पांगे:

पंचायत समिती मालवणच्या वतीने दिला जाणारा आदर्श पदवीधर शिक्षक पुरस्कार मसुरे केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक विनोद रामचंद्र कदम यांना मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे नुकताच समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती श्री राजू परुळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर,
गटविकास अधिकारी श्री जयेंद्र जाधव, गटशिक्षणाधिकारी संजय माने, सहा गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, आदी यावेळी उपस्थित होते.
शाल, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक बांधिलकी जपत आपण प्रबोधनात्मक शिक्षण आजपर्यंत मुलांपर्यंत पोहचविलेले आहे. आणि त्याच पध्दतीने ते पुढेही चालू ठेवणार आहे. पुरस्कारामुळे माझ्या सर्व कष्टांचे चीज झाले अशी प्रतिक्रीया व्यक्त विनोद कदम यांनी व्यक्त केली आहे. श्री. विनोद कदम हे जसे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहेत तसेच ते कला व क्रीडा क्षेत्रातही नावाजलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आचरा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. लीलाधर पाटकर, श्री. मुणगेकर, श्री रामा तळाशीलकर, श्री. सुरेंद्र पेंडुरकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जात अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स