हडी गावच्या श्री नागेश्वर मंदिराचा जत्रोत्सव १३ डिसेंबर रोजी..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : हडी गांवचे ग्रामदैवत श्री देव नागेश्वर मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव १३ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.सकाळी विधिवत पूजा झाल्या नंतर आदिशक्ती वालकाई देवीची मानाची ओटी भरून झाल्या नंतर ओट्या भरणे व नवस फेडणे कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ७ वा. वारकरी दिंडी भजन, दीपोत्सव, रात्री पालखी प्रदक्षिणा, रात्री उशिरा चेंद वनकर गोरे दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. मंगळवारी सकाळी दहीहंडी व महाआरती झाल्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)