ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पंचायत समिती मालवण तर्फे दिलेल्या दोन पुरस्कारांवर मसुरे केंद्रशाळेची  मोहोर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पंचायत समिती मालवण तर्फे दिलेल्या दोन पुरस्कारांवर मसुरे केंद्रशाळेची मोहोर

प्रकाशन: 12 Dec 2021 04:48 PM
वाचन संख्या 59

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे नं.१ केंद्रशाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी शिवराज सावंत यांना मालवण पंचायत समिती मार्फत दिला जाणार उत्कृष्ट आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार व पदवीधर शिक्षक श्री.विनोद रामचंद्र कदम यांना आदर्श पदवीधर शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. मसुरे नं.१ केंद्रशाळेमध्ये सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात.त्यामुळे ही शाळा कायम उच्चस्थानी राहिली आहे.मालवण पंचायत समिती तर्फे दिला जाणारा उत्कृष्ट आदर्श उच्चश्रेणी मुख्याध्यापिका पुरस्कार सौ.शर्वरी शिवराज सावंत (केंद्रशाळा मसुरे नं.१) यांना प्रदान करतेवेळी पंचायत समिती माजी सभापती सौ.मनीषा वराडकर,व पदवीधर शिक्षक श्री.विनोद कदम यांना पुरस्कार प्रदान करतेवेळी श्री.गावडे.यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर,सभापती श्री.अजिंक्य पाताडे,उपसभापती श्री.सतीश परुळेकर,गटविकास अधिकारी श्री.जयेंद्र जाधव, गटशिक्षणाधिकारी श्री.संजय माने,सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.शाम चव्हाण,माजी उपसभापती श्री.बागवे,विस्तार अधिकारी श्री.उदय दीक्षित, क्रीडाशिक्षक श्री.अजय शिंदे, केंद्रप्रमुख श्री.नितीन कदम,केंद्रप्रमुख श्री.नंदु गोसावी,केंद्रप्रमुख श्री.अनिल खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रशाळा मसुरे नं.१च्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी सदर पुरस्काराचे श्रेय मसुरे केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख सहकारी शिक्षक श्री.गुरुनाथ ताम्हणकर , श्री.विनोद सातार्डेकर ,श्री.गोपाळ गावडे,सौ.रामेश्वरी मगर, माजी जि.प.अध्यक्ष श्री.संग्राम प्रभुगांवकर , जि.प.सदस्य सौ.सरोज परब,पंचायत समिति सदस्य सौ.गायत्री ठाकुर, सरपंच श्री.संदीप हडकर तसेच शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्री.सन्मेष मसुरेकर,माजी अध्यक्ष श्री.दत्तप्रसाद पेडणेकर,माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर तसेच विद्यार्थी व तमाम पालकवर्ग यांना दिले आहे. आपल्या कामालाच देव मानून निरपेक्षवृत्तीने काम करणाऱ्या सौ.शर्वरी सावंत मँडम व श्री.विनोद कदम सर यांना पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल मसुरे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स