ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा - काजु नुकसानीची शासनाने नुकसान भरपाई द्यावी - भाजपा किसान मोर्चा , वेंगुर्लेची मागणी

अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा - काजु नुकसानीची शासनाने नुकसान भरपाई द्यावी - भाजपा किसान मोर्चा , वेंगुर्लेची मागणी

प्रकाशन: 10 Dec 2021 08:22 PM
वाचन संख्या 49

ब्यूरो न्यूज/ विवेक परब : नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजु मोहरावर प्रचंड प्रमाणात परिणाम झाला आहे . अनेक शेतकरी व बागायतदारांनी बॅंक कर्ज उचल करुन औषधे , कीटकनाशके खरेदी केली . अवकाळी पावसाळ्यापुर्वी आंबा – काजु कलमावर मोठ्या प्रमाणात फवारणी झाली होती , परंतु अवकाळी पावसामुळे शेतकरयांचा व बागायतदारांचा हा खर्च वाया गेला असुन आर्थिक नुकसान झालेले आहे . अवकाळी पावसामुळे आलेला मोहर खराब झाला असुन त्याचा परिणाम आंबा – काजु उत्पादनांवर होणार आहे . शेतकरी – बागायतदारांनी स्वतः चा घातलेला पैसा , बॅंक कर्जाद्वारे उभारलेला पैसा याद्वारे आर्थिक नुकसान होणार आहे . शासकीय यंत्रणेमार्फत या नुकसानीची पहाणी करुन पंचनामे करण्यात यावे . जेणेकरून शेतकरयांना शासकीय मदत , पिक विमा संरक्षणाचा लाभ मिळवता येईल तरी या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा करुन तात्काळ कार्यवाही व्हावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली . तसेच शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास व शेतकरी – बागायतदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्यास भाजपा किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला . यावेळी किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु , भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , महीला मोर्चा च्या सारीका काळसेकर , किसान मोर्चा ता .सरचिटणीस सत्यवान पालव , आंबा बागायतदार प्रताप गावसकर , संजय वेंगुर्लेकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर ,माजी पं.स.सदस्य पुरुषोत्तम परब , रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , ओंकार चव्हाण , वृंदा गवंडळकर , रसीका मठकर , युवा मोर्चा चे हेमंत गावडे , प्रमोद शिरोडकर ,रमेश दाजी परब , चंद्रकांत दाजी परब, गोविंद दाजी परब , सूर्यकांत दाजी परब इत्यादी आंबा – काजु बागायतदार व किसान मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स