ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदरची दिंडेजत्रा आणि दत्त जयंती उत्सव १८ डिसेंबरला

चिंदरची दिंडेजत्रा आणि दत्त जयंती उत्सव १८ डिसेंबरला

प्रकाशन: 09 Dec 2021 08:52 PM
वाचन संख्या 443

चिंदर/विवेक परब :मालवण तालुक्यातील दिंडेजत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली चिंदर गावच्या भगवती माऊलीची जत्रा आणि श्री दत्त जयंती उत्सव शनिवार १८ डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी भगवती माऊलीची साडी चोळी अलंकार नेसून विधिवत पूजा, बारापाच मानक-यांच्या उपस्थिती गा-हाणे, ओटी भरण्याचा कार्यक्रम, नैवैध्य, दिवस भर ओट्या भरण्याचा कार्यक्रम व दर्शन, संध्याकाळी ८.३०वाजता दत्त मंदिर येथे श्री दत्तजन्म, पालखी सोहळा त्यानंतर रामेश्वर मंदिराकडून ढोल ताशांच्या गजरात देव तरंगांचे वाजत गाजत भगवती मंदिरात आगमन होणार आहे. पुराण वाचन,दिंडे पाजळणे, किर्तन, गोंधळ, आरती कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दत्त मंदिर येथे पालखी सोहळा व महाप्रसाद तसेच पाच दिवस भगवती मंदिर येथे रात्री स्थानिक भजने, पुराण, किर्तन, आरती तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम व पाचव्या दिवशी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होणार आहे. लळीत उत्सवाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स